महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन
नागपूर दि. 7: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय भवन नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान निर्मिती व त्यांचे विचार यावर उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब विचार आत्मसात करुन संकल्प करण्याचे आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमास समता प्रतिष्ठान नागपूर कार्यालयातील लेखाधिकारी शिलसागर चहांदे, प्रकल्प संचालक पंकज माने,सहाय्यक लेखाधिकारी दिनेश कोवे तसेच समता प्रतिष्ठान व प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment