Tuesday, 26 January 2021

 

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

 




            नागपूर, दि.26 :  भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सकाळी ७.४५ वाजता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर पोलीस दलाची मानवंदना स्वीकारली. यावेळी सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

            कोरोनामुळे गेले वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले असून नव्या वर्षात सर्वांना उत्तम आरोग्य मिळावे अशी कामना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली. लसीकरणाची मोहिम प्रभावीपणे राबवण्यात येईल, असे सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील यावेळी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी निशिकांत सुके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी सर्वश्री जगदीश काटकर, आशिष बिजवल, शेखर घाडगे, शिवनंदा लंगडापुरे, हेमा बडे, मीनल कळसकर, अविनाश कातडे, विजया बनकर, सुजाता गंधे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अनिल सवई, जिल्हा खनिकर्म अधिकारी गजानन कामडे, नियोजन अधिकारी सुनिल नारिंगे तहसीलदार सर्वश्री राहुल सारंग, सुधाकर इंगळे, ऋषीदास पटले, चैताली सावंत, सूर्यकांत पाटील, सीमा गजभिये, निलेश पाटील, निलेश काळे, अरविंद जयस्वाल, अश्विनी जाधव, स्नेहा डोके, आदी उपस्थित होते.

******

No comments:

Post a Comment