Wednesday, 10 February 2021

आझाद चौक ते भोला गणेश चौक पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद नागपूर, दि. 10 : महापालिका क्षेत्रातील आझाद चौक, लकडी पुल व झेंडा चौक, भोला गणेश चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारी पर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे प्रस्तावित केले आहे. वाहतुकीस होणाऱ्या अडचणीमुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा -3 पॅकेज क्र 10 मधील रस्ता आझाद चौक, लकडी पुल व झेंडा चौक, भोला गणेश चौक ते सक्करदरा चौक जुनी शुक्रवारी पर्यंतचा रस्त्या सिमेंट कॉक्रीट करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याने आजाद चौक ते लाकडी पुल व झेंडा चौक ते भोला गणेश चौक पर्यंतची रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. सदर रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असून पर्यायी मार्ग सुरु होतो त्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आले आहे. जनतेने वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment