Wednesday, 10 February 2021
प्र. प. क्र. 172 दिनांक : 10 फेब्रुवारी 2021
‘जागर समतेचा सामाजिक न्यायाचा-2021’ कार्यक्रमाचे 19 फेब्रुवारीला उद्घाटन
नागपूर, दि. 10 : समाजातील वंचित लाभार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या समाजपयोगी योजनांची माहिती देण्याचे काम समाजकार्य महाविद्यालयाचे आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व समाजकार्य महाविद्यालयामार्फत ‘जागर समतेचा सामाजिक न्यायाचा-2021’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवार, ता. 19 फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन येथे करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत समाजपयोगी महत्त्वाच्या योजना तळागाळातील सर्व सामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी हा कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचविणे, संविधान जागृती अभियान, व्यसनमुक्ती अभियान तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याच्यार प्रतिबंधक कायदा यासारख्या योजनांची प्रसिध्दी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment