Friday, 5 March 2021

हत्तीरोग विकृती व्यवस्थापन साहित्याचे वाटप नागपूर, दि 5: जिल्हास्तरीय आरोग्य समितीच्या समितीचे औचित्य साधून हत्तीरोग रुग्णांसाठी उपयुक्त साहित्याचा संच जिल्हा परिषद आरोग्य समितीचे अध्यक्ष मनोहर कुंभारे व सलील देशमुख, समिती सदस्यांच्या उपस्थितीत हत्तीरोग रुग्णांना वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात 3 हजार 963 हस्तीरोगग्रस्त रुग्ण असून त्यांना पायाची सूज नियंत्रणात ठेवून त्याची स्वच्छता राखण्यासाठी या संचातील साहित्य उपयुक्त ठरणार आहे. या साहित्याचे वाटप प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावरुन हत्तीरोग्य रुग्णांना करण्यात येणार आहे. या संचाचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण आरोग्य यंत्रणेमार्फत हत्तीरोग्य रुग्णांना वेळोवेळी देण्याबाबत मार्गदर्शक सूचना श्री. कुंभारे यांनी या प्रसंगी उपस्थितांना केल्या. या कार्यक्रमात आरोगय समितीच्या इतर मान्यवर सदस्यांसह जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर, जागतिक आरोगय संघटनेच्या विभागीय समन्वयक डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, हत्तीरोग अधिकारी मोनिका चारमोडे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. 00000

No comments:

Post a Comment