Tuesday, 23 March 2021
शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतीस विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
नागपूर, दि. 23 : विभागीय आयुक्त कार्यालयात आज शहीद दिनानिमित्त उपायुक्त चंद्रभान पराते यांनी शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
सहायक आयुक्त सुनील निकम, तहसीलदार प्रताप वाघमारे, अरविंद सेलोकर, नायब तहसीलदार आर. के. दिघोळे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात आज शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment