Thursday, 18 March 2021
जलशक्ती अभियान जिल्हयात पन्नास गावात उत्साहात
नागपूर, दि.18: केंद्र सरकारचे जल शक्ती मंत्रालय व नेहरु युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी ते मार्च पर्यंत जल शक्ती अभियान जिल्हयात आयोजन करण्यात आले. नेहरु युवा केंद्राच्या स्वयंसेवकांद्वारे जिल्ह्यात 14 तालुक्यातील 50 गावात जल शक्तीअभियान राबविण्यात आला. गावागावात वॉल पेटींग, पोस्टर मेकिंग, शपथ, रॅली व घरोघरी जावून पाण्याची बचत कशी करावी, पाण्याचा योग्य उपयोगाबाबत माहिती देवून जनजागृती करण्यात आली, असे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयवीर यांनी कळविले आहे.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment