Tuesday, 9 March 2021
कृषी पर्यटन केंद्राची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
नागपूर, दि. ९: विभागातील शेतकरी कृषी पर्यटन केंद्रांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे.
राज्य शासनाने सप्टेंबर २०२० मध्ये कृषी पर्यटन धोरण जाहीर केले असून, कृषी पर्यटनातून शेतक-यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे, शहरी भागातील लोकांना शेती आणि कृषी संलग्न व्यवसायाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे केंद्र सुरू करण्यासाठी http://forms.gle/bZZ2in9TPr2ta49h9 या संकेतस्थळावर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालयाच्या कार्यालयात ०७१२-२५३३३२६ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिन
विभागात जागतिक महिला दिनानिमित्त कृषी पर्यटन राबविणा-या महिला उद्योजिकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ईशा भुते, रजनी चौधरी, कविता धकाते यांच्या हस्ते सुनिता नखाते, सुनंदा धारपुरे आणि अपर्णा सेलोकार यांचा सत्कार करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment