Thursday, 1 July 2021
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
विभागीय आयुक्त कार्यालय
हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त चंद्रभान पराते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सहाय्यक आयुक्त हरीश भामरे, तहसीलदार अरविंद सेलोकर, प्रताप वाघमारे, नायब तहसीलदार आर. के. दिघोळे यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उपजिल्हाधिकारी श्रीमती विजया बनकर, तहसीलदार सुधारकर इंगळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment