Saturday, 2 October 2021

गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती व अहिंसेचे प्रेरक - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

Ø सेवाग्राम आश्रमात बापूना केले अभिवादन वर्धा, दि 2 ऑक्टो (जिमाका) :- महात्मा गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती, अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. सेवाग्राम आश्रम हे प्रेरणास्थान आहे. आश्रमातील स्मारके जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे असे नियोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी सेवाग्राम आश्रमाला भेट देत बापुकुटीत प्रार्थना करून गांधीजींना अभिवादन केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांनी आदर्श आणि त्यागमय जीवन जगुन जगातील हजारो लोकांना प्रेरित केले. शिवाय आजही गांधींचे विचार जगाला प्रेरित करत आहे. आज महात्मा गांधींची जयंतीदिनी सेवाग्राम इथे येऊन मी स्वतःला धन्य मानत असल्याचे सांगितले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे गांधी आश्रमात आगमन होताच खासदार रामदास तडस यांनी त्यांचे स्वागत केले. तर आश्रमप्रतिष्ठानच्या वतीने आश्रमप्रतिष्ठानचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांनी स्वागत केले.यावेळी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी प्रशासनाचे वतीने राज्यपालांचे स्वागत केले. आ. पंकज भोयर, जि. प. अध्यक्ष सरिता गाखरे, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोडपे, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपूल जाधव, मिलिंद भेंडे, अविनाश देव आदींची उपस्थिती होती. 0000

No comments:

Post a Comment