नागपूर, दि. 26 : अनाथाचे नाथ म्हणून सुप्रसिध्द असलेले जेष्ठ समाज सेवक शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंकरबाबांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी शंकरबाबा पापडकर यांच्यासोबत वझ्झर येथिल बालगृहात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री हा सर्वोच्च पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीव्दारे शंकरबाबांना शुभेच्छा दिल्यात. तसेच समाजासाठी करत असलेल्या कामाचा गौरव केला.
अमरावती जिल्हयातील वझ्झर येथे स्वर्गीय अंबादास पंत बालगृहाच्या माध्यमातून अंध, अपंग तसेच पुर्णत: मतीमंद असलेल्या १२५ मुलांचा सांभाळ करत असून त्यांना स्वत:चे नाव देवून ओळख दिली आहे. राज्यभरातून विविध ठिकाणी सापडलेल्या मतीमंद बालकांचा स्विकार करुन त्यांच्या पुर्नवसनासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मतीमंद अपंग, अंध मुलांच्या पुर्नवसनासाठी १९९२ पासून त्यांचे सातत्याने कार्य सुरु आहे. या कामाची दखल घेवून त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री हा नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजसेवेतील त्यांचे हे कार्य अव्दितीय असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment