Saturday, 14 September 2024

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज नागपुरात

• रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे त्यांच्या हस्ते लोकार्पण • राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचीही राहणार उपस्थिती नागपूर, दि. 14 : मा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन दिनांक १५ सप्टेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. रामदेबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचे लोकार्पण उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती राहणार आहे. मा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे १५ सप्टेंबर रोजी दुपारी २.३५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होईल. दुपारी २.४० वाजता त्यांचे कार्यक्रमस्थळी विमानळावरून प्रस्थान होईल. दुपारी २.५५ वाजता रामदेवबाबा विद्यापीठ येथे आगमन, दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान रामदेवबाबा विद्यापीठाच्या डिजिटल टॉवर लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४ वाजता मा. उपराष्ट्रपती महोदयांसमवेत मा. राज्यपाल यांचे विमानतळाकडे प्रस्थान. दुपारी ४.२५ वाजता उपराष्ट्रपती महोदयांच्या प्रस्थानप्रसंगी मा. राज्यपाल यांची उपस्थिती. उपराष्ट्रपती यांचे नागपूर येथून प्रयाण झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मा. राज्यपाल यांचे राजभवन, नागपूर येथे आगमन व मुक्काम. १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.४० वाजता राजभवन येथून नागपूर रेल्वेस्थानकाकडे प्रस्थान. दुपारी 3.55 वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आगमन. दुपारी ४ वाजता नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस, पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस, कोल्हापूर-पुणे एक्सप्रेसला हिरवा झेंडा ते दाखवतील. सायंकाळी ५.१५ वाजता राजभवन येथे आगमन. रात्री ९.०० वाजता राजभवन येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळाकडे प्रस्थान. रात्री ९.५० वाजता विमानाने मा. राज्यपाल महोदयांचे मुंबईकडे प्रयाण होईल. 0000

No comments:

Post a Comment