Monday, 30 September 2024

‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ मध्ये नागपूर विभागातील ७ ग्राम पंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार

 विभागीय आयुक्त बिदरी यांच्या मार्गदर्शनात अभिनव यश नागपूर, दि. ३० : माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यस्तरावर प्रथमच नागपूर विभागातील ग्रामपंचायतींनी कामाची मोहर उमटविली आहे. या अभियानांतर्गत विभागातील सात ग्रामपंचायतींची राज्यस्तरीय पुरस्करासाठी निवड करण्यात आली असून १५ ग्रामपंचायतींना विभागीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभिनव यश प्राप्त झाले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निर्सगाशी संबंधीत पंच तत्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील एकूण ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायतींमध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निसर्गाचे पंचमहाभूत भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश यामध्ये कामे केली व सर्व कामांचे डेस्कटॉप मूल्यमापन व फील्ड मूल्यमापन त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल २७ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध लोकसंख्या गटानुसार जाहीर करण्यात आला. या निकालात नागपूर विभागातील एकूण ७ ग्राम पंचायतींना राज्यस्तरीय पुरस्कार व १५ ग्राम पंचायतींना विभागीय पुरस्कार प्राप्त झाले. या ७ ग्रामपंचायतींची राज्यस्तरावर उत्तम कामगिरी या अभियानामध्ये विविध मानकांमध्ये सरस कामगिरी करत विभागातील ७ ग्रामपंचातींनी राज्यस्तरावर कामाची छाप सोडली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्याच्या बेला ग्राम पंचायतीला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे १.२५ कोटींचे बक्षिस जाहीर झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्याच्या डव्वा ग्रामपंचातींने तिसऱ्या क्रमांक पटकवला असून ५० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे. या जिल्ह्यातील सालेकसा तालुक्याच्या भजेपार ग्राम पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्तेजनार्थ,चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या चीचबोडी ग्राम पंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्त्तेजनार्थ, वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या मिर्झापूर ग्राम पंचायतीला तिसऱ्या क्रमांकाचे ५० लाखांचे उत्त्तेजनार्थ, याच जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींना उंच उडी (कामाचा प्रगती आलेखात) श्रेणीत प्रत्येकी ५० लाखांचे बक्षिस जाहीर झाले आहेत. यात सेलू तालुक्याच्या हिंगणी ग्राम पंचायतीचा आणि कारंजा तालुक्याच्या ठाणेगाव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विभागीय स्तरावर या १५ ग्रामपंचायती ठरल्या अव्वल 'माझी वसुंधरा अभियान ४.०' मध्ये विभाग स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या १५ ग्रामपंचायतींची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी (ता.भद्रावती), नंदा (ता.कोरपना), आनंदवन (ता.वरोरा), भेंडवी (ता.राजुरा), पेटगाव (ता.सिंदेवाही) आणि कुकुडसात (ता.कोरपना) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव (ता.देवळी), आंजी(मोठी) (ता.वर्धा), हिंगणी (ता.सेलु), ठाणेगाव (ता.कारंजा), राजनी (ता.कारंजा) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्यातील खरबी (ता.भंडारा) ग्रामपंचायतीसह नागपूर जिल्ह्यातील गोधनी (ता.नागपूर), नेरी मानकर (ता.हिंगणा), खुर्सापार(ता.काटोल) ग्राम पंचायतींना बक्षिस जाहीर झाले आहेत. विभागातील सर्वोत्तम जिल्हा परिषदांमध्ये गोंदिया जिल्हा परिषदेला बक्षिस जाहीर झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे व जिल्हा परिषदेचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. विपीन इटनकर त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तालयातील विकास शाखेचे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, विभागीय समन्वयक संकेत तालेवार व ईशा बहादे यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींचे व जिल्हा परिषदेचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 00000

No comments:

Post a Comment