Ø पोलीस स्टेशन मधील सीसी टिव्ही बंद राहणार नाही खबरदारी घ्या
Ø विभागातील 151 पोलीस स्टेशन मध्ये 1775 सीसी टिव्ही
Ø बंद सीसी टिव्ही संदर्भात नियमीत आढावा घ्या
नागपूर दि 24 : विभागातील सर्व पोलीस स्टेशन सीसी टिव्ही कॅमेराच्या सर्वेलन्स मध्ये असणे अनिवार्य
असून जनतेलाही यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. पोलीस स्टेशनच्या परिसरात सीसी टिव्ही संदर्भात माहिती फलक लावावा तसेच या यंत्रणेचा वापर योग्य पध्दतीने व्हावा, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी गुरूवारी दिले.
नागपूर विभागातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसी टिव्ही यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली असून याचा सुयोग्य वापर होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व सीसी टिव्ही कार्यन्वीत असावे, अशी सुचना श्रीमती बिदरी यांनी पोलीस विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले. जिल्हास्तरीय पर्यवेक्षण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्रीमती बिदरी बोलत होत्या.
नागपूर विभागातील पोलीस स्टेशननिहाय सीसी टिव्ही यंत्रणेसंदर्भात आढावा घेतांना श्रीमती बिदरी यांनी विभागात एकूण 151 पोलीस स्टेशनमध्ये 1775 सीसी टिव्ही बसविण्यात आल्या आहेत. यापैकी 1721 सीसी टिव्ही सुरू असून 54 नादुरूस्त आहेत. सीसी टिव्ही यंत्रणेच्या देखभाल व दुरूस्तीसाठी तज्ञ संस्थेची निवड करण्यात आली असून सर्व यंत्रणा कायम सुस्थितीत राहील याची दक्षता जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी घ्यावी अशा सुचना यावेळी देण्यात आल्या.
पोलीस स्टेशन सीसी टिव्ही सर्वेलन्समध्ये आणण्यासाठी विभागातील सर्वे जिल्हे तसेच नागपूर शहरामधील 151 पोलीस स्टेशनमध्ये ही यंत्रण कार्यन्वीत करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर शहरातील 33 पोलीस स्टेशनमध्ये 495 सीसी टिव्ही नागपूर ग्रामीण मधील 22 पोलीस स्टेशनममध्ये 220 सीसी टिव्ही, भंडारा 17 पोलीस स्टेशनमध्ये 196, चंद्रपूर 28 पोलीस स्टेशनमध्ये 354 सीसी टिव्ही, गोंदिया 16 पोलीस स्टेशनमध्ये 160 सीसी टिव्ही, गडचिरोली 16 पोलीस स्टेशनमध्ये 160 तर वर्धा जिल्ह्यातील 19 पोलीस स्टेशमनध्ये 190 सीसी टिव्ही बसविण्यात आल्या आहे. यापैकी 54 नादुरूस्त सीसी टिव्ही तात्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अतिरीक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, सहआयुक्त प्रदिप कुलकर्णी, दुरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यावेळी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment