Ø 45 वर्षावरील पुरुष गटात गोवर्धन मीना तर महिला गटात पल्लवी मून ठरल्या प्रथम
Ø पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना राष्ट्रपतीपदक जाहीर झाल्याने पोलिसांचा जल्लोष
नागपूर, दि. 25 :
नागपूर शहर पोलीस विभागाच्या वतीने आयोजित टायगर रन मॅरेथॉन 21 कि.मी. स्पर्धेमध्ये
खुल्या गटात 1 तास 7 मिनिट वेळ राखत राजन यादव विजते ठरले तर महिला गटात नीता राणे
1 तास 17 मिनिट 56 सेकंदाचा वेळ राखत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. 45 वर्षावरील
पुरुष गटात गोवर्धन मीना यांनी 1 तास 18 मिनिट 38 सेकंद वेळ राखत तर महिला गटात 1 तास
52 मिनिट 49 सेकंद वेळ राखत पल्लवी मून यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सायबर
गुन्हेगारी व अमली पदार्थांविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहर
पोलिसांतर्फे टायगर रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. मॅरेथॉनमध्ये 10 हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना
पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ,
सह पोलीस आयुक्त निसार तांबोळी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.
उत्कृष्ट कार्यासाठी नागपूरचे
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना राष्ट्रपतीपदक पुरस्कार जाहीर झाल्याची
माहिती यावेळी डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली तसा उपस्थित पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी
एकच जल्लोष केला. डॉ. भुजबळ यांनी डॉ. सिंगल यांचे अभिनंदन केले.
21 कि.मी. अंतराच्या चारही स्पर्धेच्या
प्रथम पुरस्कार विजेत्यास 50 हजार रुपये रोख, द्वितीय पुरस्कार 30 हजार तर तृतीय पुरस्कार
20 हजार रुपये अशा पुरस्काराचे स्वरूप आहे.
विजेत्यांना 21 कि.मी., 10 कि.मी.,
5 कि.मी. अंतर स्पर्धेच्या खुल्या व 45 वर्ष वरील जास्त वयोगटातील पहिल्या तीन विजेत्यांना
एकूण साडेसात लाखांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पोलीस लाईन टाकळी परिसरातील
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरून टायगर रन मॅरेथॉनचा आज सकाळी 6 वाजता प्रारंभ होवून याच ठिकाणी सकाळी
8.30 वाजता समारोप झाला.
असा आहे निकाल
राजन यादव हे 21 कि.मी. स्पर्धेचे
विजेते ठरले 1 तास 7 मिनिटांमध्ये अंतर पूर्ण करून पटकाविले.
1 तास 18 मिनिट
7 सेकंद वेळ राखत धीरज यादव यांनी दुसरा क्रमांक पटकावला तर 1 तास 18 मिनिट 26 सेकंद
वेळ राखत लीला राम बावणे तिसऱ्या स्थानी राहिले.
21 कि.मी. महिलांच्या खुल्या
गटात 1 तास 17 मिनिट 56 सेकंद वेळ राखत नीता राणे यांनी पहिला क्रमांक पटकावला. 1 तास
19 मिनिट 18 सेकंद वेळ राखत प्राजक्ता गोडबोले दुसऱ्या स्थानी तर 1 तास 22 मिनिट
06 सेकंद वेळ राखत तेजस्विनी लांबबताने तिसऱ्या स्थानी राहिल्या.
21 कि.मी. 45 वर्षांवरील पुरुष
गटात गोवर्धन मीना यांनी 1 तास 18 मिनिट 38 सेकंद वेळ राखत प्रथम क्रमांक पटकाविला.
1 तास 20 मिनिट 55 सेकंद वेळ राखत भास्कर बावणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला तर 1
तास 21 मिनिट 08 सेकंद वेळ राखत सुनील कोडाम यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
21 कि.मी. 45 वर्षांवरील महिला गटात पल्लवी मून यांनी 1 तास 5 मिनिट 49 सेकंद वेळ
राखत प्रथम क्रमांक पटकाविला. 1 तास 52 मिनिट 59 सेकंद वेळ राखत वंदना सिंग यांनी दुसरा
क्रमांक पटकाविला तर 2 तास 23 मिनिट वेळ राखत अंजली तिवारी यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
No comments:
Post a Comment