Monday, 1 August 2016

विभागीय आयुक्त कार्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

नागपूर, दि. 1 :  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी भावपूर्ण अभिवादन केले.
यावेळी अपर आयुक्त अरुण उन्हाळे, उपायुक्त जितेंद्र पापळकर, आप्पासाहेब धुळाज, उपायुक्त झाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भावपूर्ण आदंराजली वाहतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार  म्हणाले की, अण्णाभाऊ साठे  यांनी मातंग समाजासाठी मोठ्या प्रमाणात काम केले असून त्यांच्या नावाने शासनाने अण्णाभाऊ साठे महामंडळ काढले असून या महामंडळाच्या माध्यमातून गरीब, वंचित समाजाला मदत करण्यात येते.
ते पुढे म्हणाले की, आज 1 ऑगस्ट हा महाराजस्व महसूल दिवस असून या हा दिवस  महिला सक्षमीकरण दिवस म्हणून  शासनाने साजरा करण्याचे ठरविले आहे. महिलांचे सात बारा मध्ये नाव आले नसले तर यापुढे टाकावे लागेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त आप्पासाहेब धुळाज यांनी केले.

*****

No comments:

Post a Comment