Friday, 2 December 2016

जिल्हयातील एसटी बस स्थानकाचे आधुनिकरणासाठी 10 कोटी रुपये - चंद्रशेखर बावनकुळे


  • मोरभवनचा बसपोर्ट म्हणून विकास
  • राष्ट्रीय महामार्गावर 144 बस थांबे बांधणार
  • कोराडी-महादुला येथे स्वतंत्र बस स्थानक
  • जिल्हयातील 23 बस स्थानकांचा बीओटी तत्वावर विकास

नागपूर दि.21 :   मौदा, कामठी यासह पर्यटकाच्या सुविधेसाठी महादुला येथे सुसज्ज बस स्थानकासह जिल्हयातील बस स्थानकाचा विकास व आधुनिकरणासाठी 10 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
रविभवन येथे नागपूर जिल्हयातील महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळा संदर्भातील विकास योजना तसेच प्रलंबित प्रश्नाचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार समीर मेघे, महापौर प्रविण दटके, प्रादेशिक व्यवस्थापक के.आर. मुंडीवाले, विभागीय व्यवस्थाक एस.व्ही. पंचभाई आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील एस.टी. महामंडळाच्या बस स्थानकाच्या व्यवस्थेसंदर्भात बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, मौदा व कामठी बस स्थानकाचे बांधकाम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावे, त्यासोबतच नरखेड, हिंगणा, पारशिवनी, मौदा आदी बस स्थानकाचा बांधकामाचे प्रस्तावही तयार करुन येत्या आठवडयात सादर करण्याचे सूचना करतांना महादुला व मौदा येथील बस स्थानकासाठी प्रत्येकी दीडकोटी व इतर बस स्थानकासाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे दहा कोटी रुपयाचा प्रस्ताव सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गावर 144 बस स्थानके असून प्रवासांसाठी शेडसह आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक निधी उपलब्ध दिला जाईल. असे सांगतांना ते पुढे म्हणाले की, जिल्हयात 23 बस स्थानके असून या संपूर्ण परिसराचा विकास करतांना प्रवाशांना आधुनिक सुविधासोबतच खाजगी करणाच्या माध्यमातून व्यापारी संकूलही निर्माण करुन जिल्हयातील सर्व बस स्थानके एकाच वेळी सुसज्ज करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
मोरभवन येथील बस स्थानकाच्या विकासासोबतच बसपोर्ट म्हणून विकास करण्यासाठी आवश्यक आराखडे तयार करण्याच्या सूचना करतांना येथे संयुक्त भागीदाराच्या तत्वानुसार विकास करण्यात येत असल्याचे माहिती देतांना पालकमंत्री म्हणाले की, मोरभवन येथे शहर बस वाहतुकीसाठी बस थांबा व पार्किंगचे सुविधा निर्माण करताना नागपूर महानगर पालिकेसोबत करार करुन निश्चित झालेल्या भाडेतत्त्वानुसार संयुक्त बैठक घेऊन निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
महापौर प्रविण दटके यांनी शहर बस वाहतुकीसाठी बसेससाठी थांबा व पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन दिल्यास रस्त्यावर बसेसची पार्किंग न करता निर्धारित केलेल्या जागेवर बसेसची पार्किंग करण्यात येईल. एसटी महामंडळातर्फे महानगर पालिकेला भाडेतत्त्वार लागू केलेल्या दराचा पूर्नविचार व्हावा अशी विनंती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
शहरातील पशुसंवर्धन दवाखाने ग्रामीण भागात सुरु करा
पशुसंवर्धन विभागातर्फे शहरीभागात सुरु करण्यात आलेले पशुसंवर्धन चित्किसालय नागपूर जिल्हाच्या ग्रामीण भागात तात्काळ स्थलांतरासंदर्भात येत्या पाच दिवसात अहवाल सादर करावा अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नागपूर जिल्हयात सहा पशु चित्किसालय व हॉस्पीटल स्थलांतरासंबंधी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, शहरातील दोन हॉस्पीटल जिल्हा परिषदेच्या गाजा , खैरी येथे स्थालंतरीत करतांना प्रादेशिक आयुक्तांकडे आवश्यक असणाऱ्या दवाखान्यांच्या प्रस्तावही तयार करण्याच्या सूचना देतांना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.
जिल्हयातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले की, मसळा येथे 33 केव्हीचे सबस्टेशन मंजूर असूनही पांदन रस्त्याच्या अतिक्रमणामुळे हे काम सुरु होऊ शकले नाही. महसूल विभागाने तात्काळ अतिक्रमण काढून मसाळा सबस्टेशन व बेसा येथे 33 केव्ही सबस्टेशनच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. टॉयगर गॅप ग्राऊंडची जागा झोपडपट्टी पुनर्वसनासाठी उपलबधकरुन देताना महसूल व महानगर पालिका या दोन विभागाने संयुक्त बैठक घ्यावी व तेथे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुलाचे कार्यक्रम राबविण्यात यावा अशी सूचना केली. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, माजी महापौर मायाताई इनावते यांनी उपयुक्त सूचना केल्या.
खरबी येथे कब्रस्थानच्या जागेवर असलेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे व अतिक्रमणमुक्त असलेली जागा कब्रस्थानसाठी देण्याबाबतही प्रस्ताव तयार करावा अशी सूचना करताना एनटीपीसीने दिलेल्या चार कोटी रुपयाच्या निधीमधून मौदा परिसरातील निवड केलेल्या 77 गावांमध्ये 5 मोठया मशीन व 10 टिप्पर भाडेतत्त्वार घेऊन विकास कामे सुरु करावी यासाठी एक कोटी रुपयापर्यंतचा निधी डिझेलसाठी उपलब्ध करुन द्यावा अशी सूचनाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी श्रीमती जायभाय, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
000000000

No comments:

Post a Comment