Friday, 2 December 2016

कालिदास महोत्सवाची जय्यत तयारी यावर्षीचा उद्घाटन सोहळा नगरधन येथे 20 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री करणार उद्घाटन


नागपूर, दि. 17 :  येत्या 20 ते 23 नोव्हेंबर 2016 दरम्यान  आयोजित करण्यात आलेल्या कालिदास समारोहाचे उद्घाटन 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नगरधन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती समारोह समितीचे अध्यक्ष अनूप कुमार यांनी आज येथे दिली.
गतवर्षी परंपरेचा पुन्हा अविष्कार या ब्रिदाखाली कालिदास समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.यावर्षी कुमारसंभव हे ब्रिद  असून नटराज शिवा हे प्रतिक असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गतवर्षी आयोजित परंपरेचा पुन्हा अविष्कार या कालिदास समारोहाचेी डीव्हीडी समारोह समितीने निर्मिती केली असून त्याचे प्रकाशन आज सुप्रसिध्द नाटककार व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. महेश एलकुंचवार यांच्या हस्ते करण्यात आले. या डीव्हीडीमध्ये गतवर्षी  झालेल्या विविध कार्यक्रमांचे चित्रिकरण करण्यात आले आहे.
याशिवाय यावर्षी आयोजित कार्यक्रमाच्या पुस्तिकेचेही प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
समारोह समितीचे अध्यक्ष अनूप कुमार यांनी आयोजनामागील भूमिका सादरीकरणाद्वारे विशद केली.
प्रा. महेश एलकुंचवार यांनी आपल्या मनोगतात यानिमित्ताने अनूप कुमार हे पुढाकार घेऊन सांस्कृतिक अभिरुची जतन करीत असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. ही परंपरा भविष्यातही टिकून राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रेणुका देशकर यांनी मानले.
** * * * **

No comments:

Post a Comment