Thursday, 1 December 2016

महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त मुख्यमंत्री यांचे अभिवादन




नागपूर दि 16 : महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवास स्थानी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर, सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कादंबरी बलकवडे, श्रीमती आशा पठाण आदी उपस्थित होते.
गोकुळपेठ येथील पुतळ्यास अभिवादन
गोकुळपेठ येथील महर्षि वाल्मिकी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  महर्षि वाल्मिकी यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार सुधाकर देशमुख, माजी उपमहापौर संदीप जाधव, महर्षि वाल्मिकी फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश डाबर, सचिव संजय करौसिया आदी उपस्थित होते.
*******

No comments:

Post a Comment