- पिण्याचे पाणी व स्वच्छतेसाठी विशेष उपाययोजना
- शंभर मीटरच्या परिसरात वाहनावर बंदी
- 24 तास वैद्यकीय सुविधा
- ताजबाग परिसर विकास आराखडयासाठी आवश्यक निधी
नागपूर, दि. 21 : संत ताजुद्दिन बाबा यांचा ऊर्स निमित्त संपूर्ण भारतातून लाखो भाविक एकत्र येत असल्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा व महानगर पालिका प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच भाविकांच्या निवास व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्या, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्या.
उमरेड रोड वरील संत ताजुद्दिन बाबा दर्गा परिसराला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन दिनांक 24 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या वार्षिक ऊर्स समारंभानिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांसाठी कण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, ताजुद्दिन बाबा ट्रस्टचे प्रशासक जी.एम. कुबडे, महानगर पालिकेचे अप्पर आयुक्त रिझवान सिद्दिकी, तसेच मोबीन पटेल, नगरसेविका श्रीमती जैतुनबी, शहाजाद खान, मोहम्मद ग्यासुद्दिन, ताज मोहम्मद राजा, आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
संत ताजुद्दिन बाबा दर्गा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक ऊर्स महोत्सवासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना पिण्याचे पाणी पुरविण्यासंदर्भात 15 टँकरची व्यवस्था करण्यात आली असून 5 हजार लिटरच्या टाकीमधून पिण्याचे पाणी पुरविण्यात येणारे तसेच परिसराच्या चारही बाजुनी चार पाण्याच्या टाक्या बसून तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच फायरब्रिगेडची व्यवस्था राहणार आहे. 24 तास नियमित पाणी पुरवठा यासाठी पाणी पुरवठयाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
ऊर्स महोत्सवा दरम्यान संपूर्ण परिसर स्वच्छ राहील या दृष्टीने विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना करताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, दीक्षाभूमी प्रमाणे येथील स्वच्छता असावी, कुठलाही प्रकाचे आजार प्रसरणार नाही यासाठी स्वतंत्र शंभर स्वयंसेवक नियुक्त करावे. आरोग्याच्या दृष्टीने 24 तास वैद्यकीय सुविधा तसेच आवश्यक सर्व औषध पुरवठा व रुग्णवाहिका सज्ज राहतील. या परिसरात शंभर हॅलोजन व जनरेटरची व्यवस्था करण्यात येत असून परिसरातील सर्व दिवे नियमित सुरु राहतील. या दृष्टीने महानगर पालिका व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे उपाययोजना करावयात. अशी सूचनाकेली.
- चंद्रशेखर बावनकुळे
शंभर मीटर परिसरात वाहनाला बंदी
ऊर्स निमित्त संत ताजुद्दिन बाबांच्या दर्गाच्यादर्शन घेण्यासाठी लाखो भाविक गर्दी करत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शंभर मीटरच्या परिसरात कुठलेही वाहन येणार नाही याची खबरदारी घेतांना वाहनतळासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच अपंगांसाठी ट्रस्टतर्फे दर्गापर्यंत जाण्यासाठी व्यवस्था असावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.
ताजुद्दिन बाबा यांच्या वार्षिक ऊर्स निमित्त शहराच्या विविध भागाच्या तसेच कामठी येथे शहरा वाहतुकीसाठी व्यवस्था असावी यासाठी 25 विशेष बसेस सोडण्यात याव्यात आणि या परिसरात नागरिकांसाठी बस स्थानकावर पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा उपलबध करुन द्याव्यात असेही त्यांनी सांगितले.
फाटके फोडण्यावर बंदी
यात्रा अथवा धार्मीक स्थळावर लाखो भाविक एकत्र येत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कोणीही फटाके फोडणार नाही याची खबरदारी घेतानाच अशा प्रकारच्या घटना आढळून आल्यास संबंधीतावर गुन्हा दाखल करा. यात्रा स्थळाच्या व्यवस्थापनासाठी उपविभागीय महसूल अधिकारी तथा दंडाधिकारी यांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण यात्रा स्थळाच्या व्यवस्थेची जबाबदारी राहणार आहे. ताजुद्दिन बाबा दर्गा परिसराच्या 84 एकर परिसराचासर्वांगिण विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला असून या आराखडयानुसार या परिसराचा विकास होईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलबध करुन देण्यात येईल, असेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी विविध यंत्रणातर्फे ताजुद्दिन ऊर्स परिसरात करण्यात येत असलेल्या व्यवस्थेसंबंधी माहिती बैठकी अधिकाऱ्यांनी सांगितली.
000000000
No comments:
Post a Comment