राज्यपालपदी नेमणूक झाल्याबद्दल नागपूर नगरीतर्फे गौरव
नागपूर, दि 22 : बनवारीलाल पुरोहित यांनी राजकीय, सामाजिक व शैक्षिणीक क्षेत्रात कधीही तत्वांशी तडजोड न करता आपल्या विचाराशी नेहमीच पारदर्शक राहून सामाजातील गरिब लोकांशी बाधिलकी जपत कायम संघर्ष केला. सामाजिक जीवनांत पारदर्शकता हा मंत्र जपलेल्या व्यक्तीची आसामच्या राज्यपालपदी निवड होणे हा नागपूरसह विदर्भाचा गौरव आहे. त्यांच्या राजकीय अनुभवाचा लाभ आसाम या राज्याला होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात नागपूरचे सुपूत्र माजी मंत्री व नागपूर नगरीचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांची आसामच्या राज्यपालपदी नेमणूक झाल्याबद्दल जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतांना बोलत होते.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा शाल,श्रीफळ,स्मृतीचिंन्ह तसेच मानपत्र देवून नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे होते तर विशेष अतिथी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश विकास सिरपूकर स्वागताध्यक्ष महापौर प्रविण दटके, खासदार अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, माजी खासदार दत्ता मेघे, गिरीश गांधी, संदिप जोशी व्यसपीठावर उपस्थित होते.
विचारांशी नेहमीच पारदर्शक राहीलेल्या बनवारीलाल पुरोहित यांनी सामाजिक बाधिलकी जोपासत केलेल्या कार्यामुळे सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणीक क्षेत्रात गुणवतेला नेहमीच प्राधान्य दिल्यामुळे भारतीय विद्या भवनच्या माध्यमातून उच्च परंपरा निर्माण करतांना अभियांत्रिकी क्षेत्रातही सर्वोच्य संस्था स्थापन केली. असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बाबूजीनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले त्या क्षेत्रात पारदर्शता जपली प्रसंगी त्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यांचे जीवन संघर्षशिल आहे. ते कोणालाही घाबरले नाही. जे काम हातात घेतले त्याला न्याय दिला. कोळसा हा देशातील कंपन्यानाच मिळवा यासाठी केलेल्या संघर्षामुळे दोन लाख कोटी रूपये देशाला कोळश्याच्या पारदर्शक लिलावातून मिळू शकले. तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राव्दारे मतदान करतांना पेपर ट्रेलच्या माघ्यमातून आपले मत योग्य पडले याचा विश्वास त्यांनी मतदारांना मिळून दिला आहे.
राजकीय जीवनाची सुरूवात बाबूजीकडून शिकायला मिळाली असल्याचा गैरवपूर्ण उलेख करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, चागले काम करण्याचा विश्वास तसेच सकारात्मता ही मुल्य त्यांच्याकडून मिळाले तसेच त्यांनी माझ्यावर कायम प्रेम केले आहे. नागपूरच्या तीस वर्षाच्या इतिहास बनवारीलाल पुरोहित यांच्या शिवाय पूर्ण होवू शकत नाही त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणीक क्षेत्रात प्रचंड काम करून आपले वेगळे स्थान निर्माण केल्यामुळे या सत्काराला वेगळे महत्व असल्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागपूरसह विदर्भाच्या विकासासाठी नेहमीच आग्रही राहिलेल्या बनवारीलाल पुरोहित यांची आसामच्या राज्यापालपदी निवड झाली असून ते येथील जनतेच्या विकासासाठी काम करतील. आसाममध्ये सामाजिक व आर्थिक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी मदत होणार असून आसाम या राज्यात पायभूत सुविधाच्या विकासासाठी तीस हजार कोटी रूपयांची कामे सुरू असून पूर्वउत्तर राज्याच्या विकासाला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळू शकली त्यासाठी बाबूजी सात दिवस कारावासात होते. आज पाचशे प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे आदेश दिले असून या सत्कारानिमित्य दिड हजार प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात येईल. कोलब्लाकच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढील चाळीस वर्ष पुरेल एवढा कोळसा मंजूर करण्यासाठी बनवारीलाल पुरोहित यांचा संघर्ष असल्याचेही त्यांनी सागितले.
यावेळी सर्वोच्य न्यायालयाचे माजी न्यायाधिश विकास सिरपूकर, खासदार अजय संचेती, स्वागताध्यक्ष महापौर प्रविण दटके यांनी मार्गदर्शन केले.प्रारंभी नागरी सत्कार समारोह समितीतर्फे केद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा स्मृतीचिंन्ह, मानपत्र देवून जाहिर सत्कार केला.
सत्काराला उत्तर देतांना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले की, नागपूर नगरवासीयांच्या प्रेमामुळे राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. सत्कार हा माझा नसून नागपूर नगरीचा हा सन्मान आहे. आसामच्या जनतेची सेवा निस्पृहपणे करतांना नागपूरचे नाव उंचावले असेच कार्य करण्याचा विश्वास त्यांनी यावेळी दिला. सर्वपक्षांनी एकत्र येवून सत्कार आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त करतांना आपले सर्वाचे प्रेम घेवून आसामला जात असल्याचे भावपूर्ण उदगार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन संदीप जोशी यांनी तर आभार निमंत्रक गिरीश गांधी यांनी मानले. मानपत्राचे वाचन दयाशंकर तिवारी यांनी केले.
यावेळी नागपूरसह विदर्भातील विविध क्षेत्रातील मान्यवर, लोक प्रतिनीधी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती व संस्थांच्या प्रतिनीधीनी आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा सत्कार केला.
*****
No comments:
Post a Comment