नागपूर, दि. 15 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाव्दारे आयोजित ‘आंबेडकरी जलसा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ गृह(ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
दिक्षाभूमी येथे आयोजित आंबेडकरी जलसा या कार्यक्रमात भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस श्री केसरकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. प्रारंभी भंतेजी यांनी बुध्द वंदेनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक संजय पाटील, सहायक संचालक डॉ. सोनटक्के यांच्यासह हजोरोंच्या संख्येने श्रोतागण उपस्थित होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिध्द गितकार मिलींद शिंदे, खंजीरीवादक मिराबाई उमप, गायक नागसेन सावदेकर, अजय देहाडे, शाहीर कुणाल वराळे, श्रीमती सिमा पाटील, डॉ. गणेश चंदनशिवे यांनी भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बहारदार गिते सादर करुन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करतांना श्री पाटील म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्ष राज्यात साजरे करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे आणि प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी पुढाकार घेऊन 18 फेब्रुवारी 2016 रोजी मुंबई येथे पहिला कार्यक्रम आयोजित केला होता. नागपूर येथील कार्यक्रमानंतर दिनांक 17 डिसेंबर रोजी अमरावती येथे आंबेडकरी जलसा या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले.
*******
No comments:
Post a Comment