- उत्कृष्ठ लेखन, छायाचित्रकार, दूरचित्रवाणीसाठी
वृत्तकथा व सोशल मिडीयासाठीही पुरस्कार
- अभियान जागृतीसाठीही पुरस्कार
नागपूर, दि.4 : राज्य शासनाच्या उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कारासाठी पत्रकारिता, उत्कृष्ठ लेखन, दूरचित्रवाणी वृत्तकथा, छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखानासाठी पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याच स्पर्धांसाठी 31 जानेवारी 2017 पर्यंत प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालयात स्विकारण्यात येणार आहे.
उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कारासाठी दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2016 पर्यंतच्या कालावधित प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या, दूरचित्रवाणी वृत्तकथा व उत्कृष्ठ छायाचित्रासाठी प्रवेशिका स्विकारण्यात येणार आहेत. स्पर्धांसाठी प्रवेशिका अर्ज जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन क्र.1, तिसरा माळा, सिव्हील लाईन्स येथे उपलब्ध आहेत.
पत्रकारिता पुरस्कार राज्य तसेच विभागीय स्तरांसाठी असून राज्यस्तरावर मराठी, इंग्रजी, उर्दू तसेच उत्कृष्ठ दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार राज्यस्तर, उत्कृष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार राज्यस्तर, सोशल मीडिया पुरस्कार राज्यस्तर स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार राज्यस्तरासाठी 51 हजार रुपये, मानचिन्ह व प्रशिस्तीपत्र देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
विभागीय स्तरावरील नागपूर विभागासाठी ग.त्र्य. माडखोलकर पुरस्कार 51 हजार रुपये रोख, मानचिन्ह व प्रशिस्तपत्राचा पुरस्कारामध्ये समावेश आहे. पुरस्कारासाठी प्रवेशिके सोबत मुळ लिखानाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठविणे आवश्यक आहे. लिखानावर लेखकाचे नाव असणे आवश्यक असून संपादकाचा दाखला जोडल्यास प्रवेशिकांचा विचार करण्यात येईल.
उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार 2016 साठी 31 जानेवारी 2017 पर्यंत विहित नमुन्यात संपूर्ण माहितीसह व वृत्तपत्राची कात्रणे, दूरचित्रवाणी वृत्तकथासाठी प्रसारण झालेल्या उत्कृष्ठ वृत्तकथा आदी सोबत जोडूण जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कार्यालयात सादर कराव्यात. यास स्पर्धेमध्ये पत्रकार, छायाचित्रकार, विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी अथवा कॅमेरामन तसेच सोशल मीडियामधील व्यक्तींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले आहे.
00000000
No comments:
Post a Comment