Tuesday, 10 January 2017

विभागीय आयुक्त कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन


नागपूर, दि. 3 : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अप्पर आयुक्त अरूण उन्हाळे, उपआयुक्त जितेंद्र पापळकर, पराग सोमण, लेखा सहाय्यक संचालक भाग्यश्री जाधव तहसीलदार श्रीराम मुंदडा आदी उपस्थित होते.
यावेळी स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता अशा काळामध्ये सावित्रीबाईंनी स्त्रियांना साक्षर करून समाजामध्ये नवीन क्रांती घडविली  व स्त्री-पुरूष समानतेच्या निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देवून मुलभूत परिवर्तन घडविले. त्यामुळेच आजची स्त्री पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. अशा शब्दात विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी शब्द सुमने वाहिली.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज निवासी उपजिल्हाधिकारी के. एन. के. राव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी गिरीश जोशी, तहसीलदार जीवन बनसोडे, श्रीमती प्रियदर्शनी बोरकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment