Friday, 31 March 2017

बाजार समित्यांच्या कर्ज व अनुदान वाटपासंदर्भात पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक


मुंबई, दि. 29 : अमळनेर व तुमसर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कर्ज व अनुदान वाटप प्रस्ताव आणि इतर विषयांवर पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
सुरूची निवासस्थानी ही बैठक झाली.  अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती व तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्ही समित्यांत व्यवहार, आवक-जावक वाढली आहे. वाढत्या व्यवहारांमुळे विविध सोयी सुविधा कमी पडत आहेत. त्या सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्या संदर्भात विविध उपाययोजना करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी आमदार श्रीमती स्मिता वाघ,कार्यकारी संचालक किशोर तोष्णीवाल,पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद आकरे,उपसचिव वळवी,अवर सचिव सुनील तुंबारे आदी जेष्ठ अधिकारी उपस्थित होते.   
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एम. ए. सी .पी. योजनेंतर्गत पाच कोटी पंचवीस लाख  रुपये कर्ज मागणी  प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली. समितीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एम. ए. सी .पी. योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून देणे तसेच कर्जाच्या परतफेडीचा कालावधी, व्याजदर या सर्व निकषांचा एकत्रित अहवाल अधिका-यांनी सादर करावा, असे निर्देश दिले.
०००००

No comments:

Post a Comment