नागपूर
दि.26 :- देशभरात धावणारी विज्ञान प्रदर्शनी सायन्स एक्सप्रेस
30 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान नागपूर रेल्वे स्थानकावर येणार आहे. विज्ञान विषयक रंजक
गोष्टींचा वेध घेणारे प्रयोग, हवामानातील बदल, जलवायू परिवर्तन, जैव संसाधने आणि
निसर्ग संरक्षणासाठी जैव तंत्रज्ञानाचा उपयोग अशा विविध गोष्टींचा उलगडा सायन्स
एक्सप्रेसच्या बोगीतून करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत
शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी सायन्स एक्सप्रेसला भेट देवू शकतील.
विज्ञान
विषयाबाबत आकर्षण निर्माण करण्यासाठी
रेल्वे मंत्रालयाच्यावतीने ‘सायन्स एक्सप्रेस ’ प्रयोग राबविण्यात येत आहे. सायन्स
एक्सप्रेसमध्ये विनामूल्य विज्ञानाची सफर विद्यार्थ्यांना करता येणार आहे. यावेळी
वैज्ञानिक सफरीचा विषय ‘जलवायू परिवर्तन ’ हा आहे.
सायन्स
एक्सप्रेस हा भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा (डीएसटी) विशेष प्रकल्प आहे. 16 डब्यांची वातानुकूलित
प्रदर्शनी ट्रेन ऑक्टोबर 2007 पासून भारत भ्रमण करीत आहे. आतापर्यंत 1 लाख 56 हजार
किमीचा प्रवास पूर्ण करणाऱ्या गाडीने आठ वेळा देशाचा प्रवास पूर्ण केला आहे. देशातील
510 स्थानकांवर या गाडीने आपली उपस्थिती नोंदविली आहे. आतापर्यंत 1750 प्रदर्शन
दिवसांमध्ये दर्शकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सायन्स एक्सप्रेस हे सर्वात मोठे आणि सर्वाधिक दर्शक लाभलेले
प्रदर्शन बनले असून, त्यासाठी तब्बल 12 वेळा लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या
विज्ञान प्रदर्शनीची दखल घेतल्या गेली.
सायन्स
एक्सप्रेसचे नववे पर्व हे ‘जलवायू परिवर्तन’
या संकल्पनेवर आधारीत आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून नि:शुल्क आहे. तसेच
प्रदर्शनाबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी www.sciencexpress.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन सायन्स एक्सप्रेस क्लायमेट ॲक्शन
स्पेशल (SECAS) ने
केले आहे.
****
No comments:
Post a Comment