Thursday, 27 July 2017

कारगिल युद्धातील शहीदांची नेहमीच आठवण ठेवा - दीपक लिमसे


                                                                            
                कारगिल युद्धातील शहीदांची नेहमीच आठवण ठेवा
                                                   - दीपक लिमसे
                               विभागीय माहिती केंद्रात कारगिल विजय दिन साजरा
         नागपूर दि.26 :- कारगिल युद्धात देशाच्या रक्षणासाठी भारतीय सैनिकांनी दिलेले बलिदान मोलाचे आहे. या शूरयोद्धांमुळेच कारगिल युद्धाची विजयगाथा लिहिली गेली. असे प्रतिपादन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले.
            विभागीय माहिती केंद्रात कारगिल युद्धाचा 18 वा विजय दिन आज साजरा करण्यात आला. यावेळी कॅप्टन दीपक लिमसे बोलत होते.
            यावेळी महिती व जनसंपर्क नागपूर-अमरावती  विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर, सहाय्यक संचालक जगन्नाथ पाटील व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने  उपस्थित होत्या.
            कारगिल युद्धाची विजयगाथा सांगताना कॅप्टन दीपक लिमसे म्हणाले की,  शहिद आणि जखमी झालेल्या जवानांची आठवण ठेवण्याचा हा दिवस आहे. पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून काही ठिकाणी कब्जा केला होता. त्या घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी कारगिलचे युद्ध झाले. 19 ते 25 वयोगटातील तरूण जवान आपल्या देशासाठी शहीद झाले. अत्यंत विपरीत परिस्थितीत जिंकलेले हे जगातील एकमेव युद्ध आहे. कारगिल युद्धाच्या सर्व कहाण्या या मनोरंजक नसून अंगावर शहारा आणणाऱ्या आहेत. तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी सैनिक क्षेत्रात करिअर करू शकतात. मुलींसाठी विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही कॅप्टन दीपक लिमसे यावेळी म्हणाले.
            यावेळी  संचालक राधाकृष्ण मुळी  यांचे भाषण झाले. त्यांनी कारगिल युद्धाच्या अनुषंगाने तेव्हा माध्यमांनी केलेल्या वार्ताकंनाची आणि विश्लेषणाची माहिती दिली.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन विभागीय माहिती केंद्राचे जिल्हा माहिती अधिकारी केशव करंदीकर यांनी केले.    
                                                                              ****



































No comments:

Post a Comment