Friday, 28 July 2017

श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्टचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख 'दिलखुलास'मध्ये



मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित आकाशवाणीच्या दिलखुलास कार्यक्रमात दादर  येथील श्री.गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्टचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. आकाशवाणीच्या अस्मिता  वाहिनीवरून शनिवार आणि सोमवार दिनांक २९ आणि ३१ जुलै रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारीत होईल.
निवेदिका शिबानी जोशी यांनी मुलाखत घेतली आहे.
व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शासनाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कारदेण्यात आला आहे. श्री गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्ट ही संस्था गेल्या तीस वर्षापासून मुंबई व मुंबई उपनगर सोडून बाहेर गावावरून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईंकासाठी आधारवड बनली आहे. या संस्थेचा इतिहास आणि कार्याची  माहिती श्री. देशमुख यांनी'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment