Friday, 28 July 2017

विधानपरिषद लक्षवेधी : : राज्यातील भटक्या विमुक्तांना नॉन क्रिमिलेअर मधून वगळण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करणार - मदन येरावार


            मुंबईदि. 28 : राज्यातील भटक्या विमुक्तांना नॉन क्रिमिलेअर मधून वगळण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी आज विधान परिषदेत दिली.
            राज्यातील भटक्या विमुक्तांना नॉन क्रिमिलेअर मधून वगळण्या संदर्भातील प्रश्न सदस्य हरिसिंग राठोड यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. येरावार बोलत होते.
केंद्र शासनाने प्रसिध्द केलेल्या इतर मागासवर्ग जातींपैकी तसेच विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), (क) व (ड) आणि विशेष मागास प्रवर्ग जातींना क्रिमीलेअरचे तत्व लागू करणे उचित होईल का यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडून शिफारशीसह अहवाल शासनाकडे सादर झाला असून या अहवालाची छाननी सुरू असल्याचेही श्री. येरावार यांनी लेखी उत्तरात सांगितले.
                                                                        ००००

No comments:

Post a Comment