Tuesday, 1 August 2017

जागतिक औद्योगिक संघटना म्हणून एमआयडीसी ओळखली जाईल - उद्योगमंत्री सुभाष देसाई



मुंबई दि. 1: उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे आता यापुढे आपली स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा उल्लेख जागतिक पातळीवरील औद्योगिक संस्थांच्या बरोबरीने झाला पाहिजे. येत्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही जागतिक औद्योगिक संघटना म्हणून ओळखली जाईलअसा आत्मविश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या 55 व्या वर्धापन सोहळ्याच्या उदघाटन करताना उद्योगमंत्री श्री.देसाई बोलत होते. यावेळी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटीलउद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवालएमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठीसह मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळकर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डीडी माळी आदी उपस्थित होते.
एमआयडीसी ला 55 व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देत उद्योगमंत्री श्री.देसाई पुढे म्हणालेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे राज्यातलं अव्वल क्रमांकावर असलेले महामंडळ आहे. उत्तमोत्तम कार्य करून हा अव्वल क्रमांक सातत्याने टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ गेल्या 55 वर्षांपासून प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. उद्योग क्षेत्रामध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर आहे.  हे स्थान टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. उद्योगांना आकर्षित करण्यासाठी देशातील इतर राज्यं महाराष्ट्र सरकारच्या औद्योगिक धोरणांचे अनुकरण करीत असतात.  हीच आपल्या प्रगतीची पावती आहे,असेही ते म्हणाले.
यावेळी  उद्योगमंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ‘विकास दर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन व 25 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
००००

No comments:

Post a Comment