Tuesday, 1 August 2017

पैठणी साडीवरील वस्तू व सेवा कर कमी करण्यासाठी प्रस्ताव सादर करणार - वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर


मुंबईदि. 1 : महाराष्ट्राचे महावस्त्र असलेल्या हातमाग पैठणी साडीवर लावण्यात येणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) कमी करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तो कमी करण्यासाठी वस्तू व सेवा कर परिषदेकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वित्त राज्य मंत्री दिपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत दिली.
महाराष्ट्राचे महावस्त्र असलेल्या हातमाग पैठणी साडीवर लावण्यात येणारा वस्तू व सेवा कर कमी करण्यासंदर्भात नियम 93 अन्वये सदस्य जयंतराव जाधव यांनी मुद्या उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना श्री. पाटील बोलत होते.
पैठणीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी नाते लक्षात घेतापैठणीस वस्तू व सेवा करातून करमाफी मिळावी याकरीता वस्तू व सेवा कर परिषदेकडे प्रस्ताव पाठवून शिफारस करण्यात येणार आहे. असे श्री. केसरकर यांनी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment