Friday, 29 September 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण अनुयायांनी अंगीकारावी -रामदास आठवले

नागपूर दि. 29 :- महामानव डॉबाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला प्रबोधन करणारे आहेत्यांच्या शिकवणीचा वसा अनुयायांनी अंगीकारावात्यांनी देशाला संविधानाच्या स्वरुपात अमूल्य  देणगी दिली आहेत्यायोगे मिळालेल्या धर्म स्वातंत्र्याचा अभिमान बाळगापरंतू डॉबाबासाहेब आंबेडकरांनी धर्मापेक्षा देश मोठा मानलाया तत्त्वाला धरुन आपणही धर्मा पेक्षा देशाला प्राधान्य द्यावेअसे भावनिक आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे 37 वे वा‍‍र्षिक अधिवेशन आज खामला  चौक येथील विजयश्री पराते सभागृह येथे आयोजित करण्यात आले होतेत्यावेळी ते बोलत होतेयाप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळेविचारवंत प्राडॉमधूकर कासारेसेवानिवृत्त  जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.पीपाटीलउच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲङ प्रभाकर मारपकवारभारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटपटू मोना मेश्रामकास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष रविंद्र पालकेसत्यदेव रामटेकेडॉसोहन चवरे तसेच राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले,  डॉबाबासाहेब आंबेडकर यांनी देशवासीयांना गुलामगीरीच्या जोखडातून मुक्त केलेत्यामुळे देशात फार मोठी क्रांती झालीत्यांच्या संघर्षामुळेच आज समाजातील चुकीच्या चालीरितींना तिलांजली मिळालीत्यांचे विचार समाजाला आजही प्रेरणादायी आहेत्यांनी त्या काळी भविष्यात पाणीसाठ्याचा प्रश्न  उद्भवू नये यासाठी नदीजोड प्रकल्पसिंचन व्यवस्थापाणी अडवणे आणि जिरविणे याबाबत उपयुक्त योजना सुचविल्या होत्याआजही कालबाह्य झाल्या नाहीत.मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलतांना ते  म्हणाले कीआरक्षण हा संविधानाने दिलेला हक्क आहेतो हक्क कोणीही हिरावून घेणार नाही,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 सामाजिक  न्यायमंत्री  राजकुमार बडोले म्हणाले कीडॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आज कित्येक मागासवर्गीय मुला-मुलींनी उल्लेखनिय कामगिरी बजावली आहेही बाब निश्चितच प्रशंसनीय आहेडॉबाबासाहेबांचा आदर्श डोळयासमोर ठेऊन आपण एकजुटीने राहायला हवेधर्म संप्रदायामध्ये अडकून न राहता आपली प्रगती त्यायोगे राज्याची प्रगती कशी होईल यादृष्टीने विचार करायला हवाते पुढे म्हणाले की,  कृष्णा इंगळे यांच्यामुळे कास्ट्राईब कर्मचारी  संघ तयार झालासंपूर्ण देशात कास्ट्राईब ही एकमेव मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करणारी संघटना असून शासनासोबत नियमित चर्चा करुन सर्व सामान्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सातत्याने सोडवित असते.आरक्षणाबाबतच्या मुद्यावर येत्या हिवाळी अधिवेशन काळात चर्चा करण्यात येईलयाबाबतीत मागासवर्गीयांवर कोणावरही अन्याय होणार नाही.मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व फी माफीबाबत शासनस्तरावर हिवाळी अधिवेशन काळात चर्चा करुन त्यावर लवकरच  निर्णय घेण्यात येईल
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने भारतीय महिला क्रिकेट संघाची क्रिकेटपटू  मोना मेश्राम हिला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते 25 हजार रुपयांचा चेक देऊन गौरविण्यात आलेमोना मेश्राम यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी बोलून सरकारी कोटयातून घर मिळवून देण्याचे आश्वासन श्रीरामदास आठवले यांनी यावेळी दिलेउद्या दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मोना मेश्राम सत्कार करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव कांबळे यांनी केलेसंचालन बाळासाहेब थोरात तर आभार कार्याध्यक्ष रविंद्र पालवे यांनी मांडले

No comments:

Post a Comment