Tuesday, 28 November 2017

विशेष शाळातील शिक्षकांच्या मागण्या सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सोडविण्यात येतील - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले




            मुंबईदि. 28 : विशेष शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्या सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सोडविण्यात येतीलअसे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले.
            विशेष गरजा असलेल्या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्या संदर्भात मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत श्री. बडोले बोलत होते. यावेळी आमदार कपिल पाटीलसामाजिक न्याय विभागाचे सह सचिव व अपंग कल्याण आयुक्त ज्ञा. ल. सुळसामाजिक न्याय विभागातील अधिकारी तसेच विशेष शाळेतील शिक्षक व प्राचार्यकर्मचारी उपस्थित होते.
            प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कर्णबधिर व एक अंध विद्यार्थी शाळेला दहावीपर्यंत वर्ग घेण्यास मान्यता देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईलअसे सांगून श्री. बडोले म्हणालेविशेष मुलांच्या ज्या शाळा बंद आहेत तेथील अतिरिक्त ठरलेले शिक्षक यांचे इतर ठिकाणी समायोजन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच समायोजन करताना जिल्ह्यानुसार शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत नियोजन करावे. विशेष शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या पदाचा आकृतीबंद ठरविण्याबाबतच्या 18 ऑगस्ट 2004 च्या शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होण्याबाबत परिपत्रक निर्गमित करावेअशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            विशेष शाळांमधील शिक्षकांची रिक्त असलेली पदे इतर ठिकाणी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमधून समायोजित पद्धतीने भरावीतशिक्षकांना वेतन नियमित मिळण्यात अडचणी येत आहेतत्याबाबतही मार्ग काढावापदोन्नतीने शाळेतील रिक्त झालेले प्राचार्यांचे पद भरावेअशा विविध मागण्या यावेळी आमदार श्री. पाटील यांनी केल्या.
००००

No comments:

Post a Comment