मुंबई, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास’ कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून बुधवार, दि. २९ आणि गुरुवार, दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत संजय भुस्कुटे यांनी घेतली आहे.
तीन वर्षातील शिक्षण विभागाची यशस्वी वाटचाल, शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणारे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे अभियान, या अभियानांतर्गत डिजिटल होत असलेल्या शाळा, विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांविषयीची माहिती श्री. तावडे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment