Wednesday, 29 November 2017

जनतेला थेट योजनांचा पारदर्शकपणे लाभ पोहचवा - डॉ. सिध्दार्थ गायकवाड



केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ
वित्तीय व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून

नागपूर, दि.29 :    केंद्र व राज्य शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ सार्वजनिक वित्तीय व व्यवस्थापन (पीएफएमएस) वितरण प्रणालीद्वारे विभाग प्रमुखांनी करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे अर्थसहाय्य योजनांचा लाभ पोहचविण्याबाबत आयोजित विभाग प्रमुखांची कार्यशाळा यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक मधुर मनोरथ, श्री. वाघ, आयआयटी समन्वयक राजेश घुमे, युगांग भारद्वाज, गणेश टेकाडे, सुधीर अंब्राते आदी उपस्थित होते. ही कार्यशाळा दोन आयोजित करण्यात आली आहे.
सामाजिक न्याय विभागातर्फे पीएफएमएस प्रणालीचा वापर करण्यात येत असून याअंतर्गत विभागातील 75 कार्यालयाची नोंदणी झाली आहे. विभागीयस्तरावर या प्रणालीद्वारे वित्तीय वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून संगणकीय प्रणालीमध्ये शासनाच्या योजना डीबीटी पोर्टल प्रणालीवर नोंदणी करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही कार्यशाळा राज्यातील सहा विभागात आयोजित करण्यात येणार असून पाचशे कार्यलयांच्या नोंदणी या डीबीटी पोर्टल प्रणालीमध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांना थेट त्याचे बँक खात्यात शासनामार्फत मिळणाऱ्या लाभाची शंभर टक्के रक्कम जमा होणार आहे.
शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच पारदर्शकपणे लाभार्थ्यांची निवड करुन त्यांना याप्रणालीचा लाभ देण्याचे आवाहन यावेळी डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले.
00000000

No comments:

Post a Comment