Tuesday, 30 January 2018

चिंतामण वनगा यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

वृ.वि. 248                                                                                    
                                                                                                     दि. 30 जानेवारी2018



मुंबई, दि. 30 : पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
खासदार चिंतामण वनगा यांचे आकस्मिक निधन झाल्याचे समजून वाईट वाटले.श्री वनगा सामान्य जनतेसाठी सातत्याने कार्य करणारे प्रामाणिक लोकप्रतिनिधी होते. त्यांचे जीवन आदिवासींच्या विकासासाठी समर्पित होते. संसद सदस्य या नात्याने त्यांनी आदिवासींच्या मूलभूत समस्यांना तसेच पालघर जिल्ह्याच्या विविध प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडली. आपण तेराव्या लोकसभेचे सदस्य होतो तेव्हापासून आपला श्री वनगा यांचेसोबत परिचय होता. त्यांच्या निधनाने राज्याने आदिवासींच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी निष्ठेने झटणारा सच्चा लोकसेवक गमावला आहेअसे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
००००

No comments:

Post a Comment