मुंबई, दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंत्रालयाजवळील उद्यानातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार व फुले अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विविध धर्मगुरुंनी सर्वधर्म प्रार्थनेचे वाचन केले. याप्रसंगी श्री. तावडे यांनी विद्यार्थ्यांबरोबर ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम’ हे भजन गायले.
यावेळी नगरसेवक राजेंद्र नरवणकर, महात्मा गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष देवराज सिंग, उपाध्यक्ष सुमन पोवार, महासचिव किशोर मारवाडी,सचिव राम जाधव, प्रा. अमर सिंग आदींसह कुलाबा माध्यमिक शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment