Thursday, 1 February 2018

रोजगारनिर्मितीवर भर देणारा अर्थसंकल्प - कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर

अर्थसंकल्प प्रतिक्रिया
मुंबई, दि. 1 : आज मांडण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये युवकांना रोजगारभिमुख आणि प्रशिक्षित करण्यावर भर देण्यात आला असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प युवकांना प्रोत्साहित करणारा आहे अशी प्रतिक्रिया कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली आहे. शिक्षणव्यवस्था सक्षम करताना डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आला आहे. याशिवाय 50 लाख तरुणांना नोकरीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या वर्षभरात 70 लाख नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.विद्यार्थ्यांसाठीची पंतप्रधान रिसर्च फेलो स्कीम, देशातील शिक्षणासाठी 1 लाख कोटी रुपये यामुळे आजच्या युवकांना अधिकाधिक चांगल्या पध्दतीने शिक्षण घेण्यास आणि रोजगार प्राप्त करण्यास सोपे होणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.  प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी 'राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोष' योजना जाहीर करण्यात आली असून रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता अधिक सुलभ आणि आरामदायी होणार आहे.
००००



No comments:

Post a Comment