मुंबई, दि.1
: कारखान्याचे प्रदूषित पाणी नदीमध्ये किंवा नागरी वस्तीमध्ये सोडल्यास कठोर
कारवाई करण्यात येईल, असे पर्यावरण व उद्योग राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे-पाटील
यांनी सांगितले.
श्री. पाटील यांनी मंत्रालयात कारखान्यातील
प्रदूषित पाण्यासंदर्भात बैठक घेतली ठाणे
जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, आणि
उल्हासनगर या भागात अनेक छोटे मोठे उद्योग आहेत. अनेक कारखाने सांडपाणी प्रक्रिया
प्रणालीकडे दुर्लक्ष करतात. कारखान्यांचे रसायन मिश्रित प्रदूषित पाणी नदी , नाले या ठिकाणी
सोडले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. काही ठिकाणी
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाच्या
अधिकाऱ्यांनी अशा कारखान्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश
श्री. प्रवीण पोटे पाटील यांनी दिले.
००००
No comments:
Post a Comment