Thursday, 1 February 2018

सौभाग्य योजनेतून वीज कनेक्शन देण्याची घोषणा स्वागतार्ह - ऊर्जामंत्री

मुंबई, दि. 1:सौभाग्य योजनेतून वीज कनेक्शन नसलेल्या देशातील 4 कोटी कुटुंबाना मोफत वीज कनेक्शन देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. 18 कोटी महिलांना उज्‍ज्वल गॅस कनेक्शनचा निर्णय ग्रामीण व गरीब महिलांना दिलासा देणारा. महिलाबचत गटांना 42 हजार कोटींवरून 55 हजार कोटी कर्ज देण्याचा निर्णय गरीब महिलांना सक्षम व स्वत च्या पायावर उभे करणारा आहे असेही ते  पुढे म्हणाले.
            केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी आज सादर केलेले अंदाजपत्रक शेती व ग्रामीण भारताच्या विकासासह ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणारे असून बेरोजगार, ग्रामीण भागातील महिला, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण सर्वच क्षेत्राच्या विकासाला चालना देणारे हे अंदाजपत्रक असल्याची व या अंदाजपत्रकाचे स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

००००

No comments:

Post a Comment