Thursday, 1 February 2018

वरिष्ठ कोषागार कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी

नागपूर, दि. 1 :  राष्ट्रीय कोषागार दिनानिमित्त आज वरिष्ठ कोषागार कार्यालय आणि कोषागारे नागपूर विभागाच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सहसंचालक लेखा व कोषागार विजय कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी वरिष्ठ कोषागार अधिकारी अमोद कुंभोजकर, सहायक संचालक मनोहर बागडे, श्रीमती  शुभदा चिंचोळकर, लेखा अधिकारी अर्चना सोळंकी उपस्थित होत्या.
आरोग्य तपासणी शिबिरात दंत, नेत्र, हदयरोग, तसेच रक्त चाचण्या करण्यात आल्या . यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पर्यावरणपूरक सायकलचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रण घेवून विविध आरोग्य तपासण्या करवून घेतल्या.
                                                                   ***

No comments:

Post a Comment