मुंबई, दि. 28 :राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि
बळीराजा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून डिसेंबर 2019 अखेर 11.25 लाख हेक्टर
क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री
विजय शिवतारे यांनी आज विधान सभेत सांगितले.
नियम 293 अन्वये सदस्य शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती.
त्याला उत्तर देतांना श्री. शिवतारे बोलत होते. सिंचन प्रकल्पांची जी कामे 75 टक्के पूर्ण झाली, ती कामे पूर्ण करण्यावर गेल्या चार वर्षात प्रयत्न
करण्यात आले. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून राज्यात 26 प्रकल्प मंजूर असून त्यासाठी राज्याला केंद्र शासनाकडून 3830 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून सुमारे 6
लाख हेक्टर सिंचनक्षेत्र निर्माण होणार आहे.
बळीराजा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून राज्यात 112 प्रकल्प असून विदर्भ, मराठवाडा व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यासाठी 10 हजार 868 कोटी खर्च
करण्यात येणार आहे.
205 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता
देण्यात आली आहे. राज्यात उपलब्ध पाणीसाठ्याचा तंत्रशुद्ध पद्धतीने वापर करण्याचे
नियोजन करण्यात आले आहे, असे मंत्री महोदयांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, गणपतराव देशमुख, जयकुमार
गोरे, अनिल बाबर, विरेंद्र जगताप,
राजेंद्र पाटणी आदींनी भाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment