मुंबई, दि. 28 :मराठी भाषा
भवन मुंबईत उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून यासाठी मुंबईत तीन जागांची
निवड करण्यात आली आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत
सांगितले.
सदस्य
हेमंत टकले यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना श्री.तावडे बोलत होते.
पहिली ते बारावी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी या मागणी संदर्भात विचार करण्यात
येईल. तसेच ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे योगदान विचारात घेऊन त्यांच्या
नावाला साजेसे असे काही करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री.तावडे यांनी यावेळी सांगितले.
या
चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला होता.
००००
No comments:
Post a Comment