मुंबई, दि. 28 : ज्येष्ठ नागरिक म्हणून वयाची अट
65 वरुन 60 करण्याबाबतचा निर्णय येत्या दोन महिन्याच्या आत घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानपरिषदेत
सांगितले.
सदस्य
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा व इतर समस्यांविषयी लक्षवेधी
सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना श्री. कांबळे पुढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी महानगरपालिका
क्षेत्रात ज्या जागा ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी-सुविधेसाठी आरक्षित ठेवल्या आहेत
त्या तशाच ठेवण्याबाबत तसेच या जागा वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन
निर्णय घेण्यात येईल. मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गत ज्या संस्थांचे अनुदान
बंद झाले त्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न केला. स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने
कोल्हापूरच्या धर्तीवर आजारी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सुरु करण्याबाबत प्रयत्न
करण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतनीस देणाऱ्या संस्थेने अशा मदतदारांची पूर्ण
चौकशी करुनच त्यांना पाठवावे, असे संबंधीत संस्थेला निर्देश
देण्यात येतील, असे न केल्यास व मदतनीसांकडून काही गुन्हा
घडल्यास संबंधीत संस्थेला सहआरोपी करण्यात येईल, असेही
त्यांनी यावेळी सांगितले.
या
लक्षवेधी चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला होता.
००००
No comments:
Post a Comment