Wednesday, 28 March 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे संचालक सुनिल मगर यांची मुलाखत


मुंबई,दि.28: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे  संचालक सुनिल मगर  यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत शुक्रवार दि. 30 मार्च रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारीत होणार आहे.ही मुलाखत निवेदिका रूपलक्ष्मी शिंदे-चौगुले यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाला जानेवारी मध्ये 51 वर्ष पूर्ण होऊन 52 व्या वर्षी पदार्पण करताना बालभारतीमध्ये बरेच बदल झाले. या मंडळाच्या प्रगतीचा आढावा, मंडळाची रचना,कार्यपद्धती, गुणवत्ता व कार्यक्षमता, बदलत्या तंत्रज्ञानामुळे शिक्षण व्यवस्थेतील आव्हानाप्रमाणे पाठ्यपुस्तकांत बदल, मुलांवर संस्कार घडवण्यासाठी 1971 साली सुरु करण्यात आलेले "किशोर" मासिक, डिजिटल बालभारती व भविष्यातील योजना याबाबत श्री. मगर यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment