नागपूर, दि. 28 : दुय् यम निबंधक कार्यालयामध्ये सुट्टीच्या दिवशी व्यवहारांची नोंदणी करणे सूलभ व्हावे यासाठी महाविर जयंती व गुडफ्रायडे या दिनांक 29 व 30 मार्च रोजी दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असली तरी दुय्यम निबंधकांचे सर्व कार्यालय शुक्रवार दिनांक 30 मार्च रोजी सुरु राहणार आहेत.
दुय्यम निबंधक कार्यालयाकडे दरवर्षी 1 एप्रिल रोजी मिळतीचे बाजारमूल्य दर तक्ते सुधारीत करणे तसेच आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पक्षकारामधील ठरलेल्या व्यवहाराची नोंदणी करणे या व्यवहारामध्ये वाढ होत आहे. सलग दोन दिवस सार्वजनिक सुट्टया आल्यामुळे दिनांक 31 मार्च रोजी नोंदणीसाठी गर्दी लक्षात घेता दिनांक 30 मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधकांची कार्यालय सुरु राहणार असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक नागपूर शहर आर.जे. राऊत व ग्रामीणचे ए.एस. उबळे यांनी दिली.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय, सहदुय्यम निबंधक वर्ग-2, नागपूर शहर, हिंगणा आणि दुय्यक निबंधक कार्यालय रामटेक, मौदा, पारशिवनी,कुही, काटोल, नरखेड, कळमेश्वर, उमरेड, कामठी, भिवापूर, सावनेर, येथील दस्त नोंदणी सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे.
00000000
No comments:
Post a Comment