मुंबई दि. 31: हौशी हिंदी नाट्यस्पर्धेला गेल्या काही
वर्षात चांगला प्रतिसाद मिळत आहे.सध्या हौशी हिंदी नाट्यस्पर्धा एकाच केंद्रावर
घेण्यात येत असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संस्थांचा सहभाग विचारात घेता
पारितोषिकांची संख्याक कमी होती. त्यामुळे आता हौशी हिंदी नाट्य स्पर्धेच्या
पारितोषिकांमध्ये वाढ करण्यात आली असून 57 व्या महाराष्ट्र
राज्य नाट्यस्पर्धेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत
घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य महोत्सवाअंतर्गत हौशी मराठी, हिंदी, संस्कृत,
बालनाटय आणि मराठी व्यावसायिक नाटय स्पर्धेतील पारितोषिकांच्या रकमेत
वाढ आणि सादरीकरणासाठी येणारा खर्च आणि दैनिक भत्ता यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
आता राज्य नाट्य महोत्सव अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या हौशी हिंदी नाट्य स्पर्धेतील
पारितोषिकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
उत्कृष्ट नाटक यामध्ये आता चौथे
आणि पाचवे पारितोषिक दिले जाणार असून पारितोषिकाची रक्कम अनुक्रमे 30 हजार रुपये आणि 20
हजार रुपये असेल. दिग्दर्शन, नाट्यलेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य, रंगभूषा
यामध्ये सुध्दा आता तिसरे पारितोषिक दिले जाणार असून यामध्ये दिग्दर्शनासाठी 20 हजार रुपयांचे पारितोषिक तर नाट्यलेखनासाठी 10 हजार
रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. प्रकाशयोजना, नेपथ्य आणि
रंगभूषा यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपयांचे पारितोषिक दिले
जाणार आहे. अभिनयासाठी रौप्यपदक दिले जाणार असून यामध्ये 3
पुरुष आणि 3 महिला याचाच अर्थ 6
कलाकारांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार
आहे. याशिवाय अभिनयासाठी एकूण 5 पुरुष आणि 5 महिला अशा 10 जणांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
0000
No comments:
Post a Comment