मुंबई, दि.31: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात
महाऑनलाईन सेवा या वेबसाईटच्या कामकाजा विषयी महाऑनलाईनचे मुख्य परिचालन अधिकारी
प्रसाद कोलते यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत सोमवार दि.2, मंगळवार दि. 3 आणि बुधवार दि.4 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनी
वरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका पुनम चांदोरकर
यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्र शासन आणि टाटा
कन्सल्टंसी सर्विसेस यांचा संयुक्त उपक्रम असणा-या महाऑनलाईनची स्थापना,नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा,महाऑनलाईनद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम,प्रधानमंत्री
राष्ट्रीय मदत निधीस करण्यात आलेली मदत, महाऑनलाईनला
मिळालेले पुरस्कार आणि डिजिटल लॉकर आदी विषयाची माहिती श्री. कोलते यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment