मुंबई, दि. 28 : राज्यात सुमारे 6 लाख नोंदणी केलेले घरेलू कामगार असून या
कामगारांचा समावेश असंघटीत कामगारांमध्ये करुन त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार
करण्यात येणार असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आज विधान
परिषदेत दिली.
सदस्य
विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी घरेलु कामगारांच्या संदर्भात उपस्थित केलेल्या
लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.
श्री.
देशमुख म्हणाले, घरेलू कामगारांना
असंघटीत कामगारांमध्ये समावेश केल्याने असंघटीत कामगारांसाठी असलेले लाभ त्यांना
लागू होतील. त्यात कामाचे दर निश्चित करणे, दरवर्षी त्यात
वाढ करणे या सारख्या बाबींचा समावेश आहे. असंघटीत कामगार कल्याणासाठी एकत्रित
कल्याण मंडळ काढण्याचा देखील शासनाचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment