Monday, 2 April 2018

कर्जमाफी योजनेला 14 एप्रिलपर्यंत मुदतवाढ वंचित शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा - सहकारमंत्री सुभाष देशमुख


मुंबई, ‍दि. 2 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत आता 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी  अशा शेतकऱ्यांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले.
तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही एकवेळ समझोता (वन टाईम सेंटलमेट) योजनेंतर्गतही पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरण्याचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत 36.95 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर 14 हजार 564 कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत.
००००


No comments:

Post a Comment